Posts

शिक्षणाचे महत्त्व !

शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे, तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही, तर ते जन्मभर चालू असते. तसेच शिक्षण हे शाळेबाहेरही चालू असते. यातूनच औपचारिक व अनौपचारिक शिक्षण या संकल्पना पुढे आल्या. मानवाला ज्ञात असलेली बरीच शास्त्रे वर्णनात्मक असतात मात्र तत्त्वज्ञान हे मूल्यमापनात्मक शास्त्र आहे. ते कोणत्याही गोष्टीचे मूल्य, हेतू आणि उपयोग काय आहे, हे पाहणारे शास्त्र आहे, एखादया लहान घटनेपासून ते थेट विश्वयोजनेपर्यंत सर्व गोष्टींचा व अनुभवांचा गूढार्थ शोधून काढणे व शास्त्रशुद्घ संगती लावणे, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे. तत्त्वज्ञान काहीसे अव्यक्त असते व या शास्त्रात तर्कशास्त्राच्या साहाय्याने विचार करावयाचा असतो. तत्त्वज्ञानात मोठमोठया गहन प्रश्नांचा विचार केला जातो. थोडक्यात मानवाच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान होय. विश्वाच्या व जीवनाच्या वैविध्यपूर्ण तपशीलाचे सर्वसमावेशक असे संकलन करण्याचा प्रयत्न म्हणजे तत्त्वज्ञान होय. मानवाला येणाऱ्या विविध अनुभवांची संगती लावणे, त्यात एकसूत्रीपणा आणणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय. एका अर्...